केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज जपानमधील टोकियो इथे होत असलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर जयशंकर यांचं दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी काल टोकियो इथे आगमन झालं. या बैठकीत ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेतील उच्चस्तरीय राजनैतिक अधिकारी एकत्र येणार असून आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेण्याची ही संधी आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
Site Admin | July 29, 2024 11:12 AM
केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री आज जपानमधील टोकियो इथे होत असलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार
