रशियाची राजधानी मॉस्को इथे आज एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लपवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने रशियाच्या अणुसंरक्षण दलाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांच्या सहाय्यकाचाही यात मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना क्रेमलिनच्या आग्नेय दिशेला असलेल्या एका रस्त्यावर घडली. किरिलोव्ह यांनी एप्रिल २०१७मध्ये दलाचं नेतृत्व स्वीकारलं होतं. या हल्ल्याची जबाबदारी यूक्रेनच्या सुरक्षा दलांनी स्वीकारली आहे.