रशिया आणि अमेरिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये उद्या चर्चा होणार आहे. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि पुतीन यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार युरी उश्कोव्ह चर्चेत सहभागी होण्यासाठी उद्या सौदी अरेबियाच्या राजधानीत दाखल होतील, असं रशियन राष्ट्राध्यक्षाच्या कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितलं. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. रशिया-युक्रेन यांच्यातल्या संघर्षावर शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढण्यासाठी तसंच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीची तयारी करण्यासाठी यावेळी चर्चा होईल, अशी माहिती रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयानं दिली आहे.
Site Admin | February 17, 2025 8:39 PM | America | Russia
रशिया आणि अमेरिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये उद्या चर्चा होणार
