युक्रेनमधील उर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील 30 दिवस युध्दविराम करण्याबाबत सहमती झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यादरम्यान 90 मिनिटं दुरस्थ माध्यमातून काल चर्चा झाली. त्यांनतर ही माहिती देण्यात आली. दरम्यान उर्जा क्षेत्रातील युध्दबंदीसंदर्भात युक्रेननं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मात्र, रशियन राष्ट्राध्यक्ष संपूर्ण युक्रेनमधील युद्धबंदीला विरोध करत आहेत. अशी माहिती क्रेमलिननं दिली आहे. तीन वर्षांच्या संघर्षादरम्यान जप्त केलेल्या जमिनी आणि वीज प्रकल्पांबाबत पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याची अपेक्षा ट्रंप यांनी या संभाषणापुर्वी व्यक्त केली. गेल्या आठवड्यात सौदी अरेबियात परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेदरम्यान युक्रेनियन अधिकाऱ्यांनी अमेरिकन प्रस्तावाला सहमती दर्शविल्यानंतर काल ही चर्चा झाली. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना रशियन सैन्याची कारवाई लक्षात घेता शांतता कराराविषयी साशंकता व्यक्त केली आहे.