रशिया आणि युक्रेन यांनी काल रात्रभर परस्परांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. काल रात्री रशियानं एकूण १४५ ड्रोन्स सोडले. एकाच रात्रीतला हा सर्वात मोठा ड्रोनचा मारा होता. आज सकाळी युक्रेननं मॉस्कोवर ३४ ड्रोन्सचा मारा केला. २०२२ मधे हा संघर्ष सुरु झाल्यापासून रशियावर राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोनहल्ला आहे. या हल्ल्यामुळे मॉस्कोमधल्या तीन प्रमुख विमानतळांवरची वाहतूक इतरत्र वळवावी लागली. आता वाहतूक सुरळीत असल्याचं रशियाच्या हवाई वाहतूक निरीक्षक संस्थेनं म्हटलं आहे. या ड्रोन हल्ल्यात एकजण जखमी झाला, मात्र कुठंही मोठी हानी झाल्याचं वृत्त नाही.
Site Admin | November 10, 2024 8:02 PM | Russia | Ukraine
रशिया आणि युक्रेनकडून परस्परांवर ड्रोनचा बेछूट मारा
