रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध बंदीसाठी आणि दोनही देशांचे संबंध सुधारण्यासाठी वाटाघाटी घडवून आणण्याच्या उद्देशानं दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांसह, वरिष्ठ अमेरिकी आणि रशियाचे अधिकारी आज सौदी अरेबियात चर्चा करणार आहेत. तीन वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या लष्करी कारवाईनंतर ही दोन्ही पक्षांमधील सर्वात महत्त्वाची बैठक असेल. अशी माहिती रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार युरी उशाकोव्ह सौदीची राजधानी रियाधला इथं या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिका-रशिया चर्चेत युक्रेन भाग घेणार नाही असं युक्रनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं.
Site Admin | February 18, 2025 11:08 AM | Russia-Ukraine conflict
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धबंदीसाठी रियाध इथं बैठक
