इस्रायल-हमास युद्धात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले असल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. या संघर्षात सुमारे १ लाख १३ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. आज ही ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली. गेल्या आठवड्यात इस्रायलने अचानक हवाई हल्ले करत युद्धबंदी संपवल्यापासून ६७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण आकडेवारीत सैन्य आणि नागरिक असं विभाजन मंत्रालयानं केलेलं नाही.
Site Admin | March 23, 2025 8:17 PM | Hamas | Israel
इस्रायल-हमास युद्धात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
