संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत युक्रेनने मांडलेल्या रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत आणि चीन हे दोन्ही देश अलिप्त राहिले आहेत. तर ठरावाच्या विरोधात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मतदान केलं आहे. ठरावाच्या बाजूनं ९३, विरोधात १८ आणि ६५ देश गैरहजर राहिल्यानं हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान सध्या अमेरिका रशियासोबत युक्रेनसंबधी शांती-प्रस्तावावर चर्चा करत आहे.
Site Admin | February 25, 2025 1:48 PM | Russia-Ukraine
रशियाचा निषेध करणाऱ्या युक्रेनच्या ठरावाला अमेरिकेचा विरोध, भारत-चीन तटस्थ
