सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांनी प्रलंबित ठेवले आहेत. सिरियात बंडखोरांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर अध्यक्ष बशर-अल-असाद यांनी पलायन केलं; त्यानंतर युरोपीय राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिरियामधल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि तिथली राजकीय स्थिती स्पष्ट होईपर्यंत कोणताही निर्णय घेणार नसल्याचं जर्मनी आणि ब्रिटनकडून सांगण्यात आलं आहे. जर्मनीनं या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सिरियातून आश्रय मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून जर्मनीकडे आश्रय मागणाऱ्यांमध्ये एकट्या सिरियातून 72 हजारहून अधिक अर्ज आले आहेत.
Site Admin | December 10, 2024 9:48 AM | Russia | SyriaCrisis