हेरगिरी आणि घातपाताचा ठपका ठेवत रशियाने मॉस्कोमधल्या सहा ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांची मान्यता रद्द केली आहे. युक्रेनसोबतच्या संघर्षात मॉस्कोचा पराभव करण्याच्या हेतूने हे अधिकारी काम करत असल्याचा आरोप रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्विस या संस्थेने केला आहे. लंडन इथलं ब्रिटीश परराष्ट्र विभागाचं कार्यालय युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाचा पराभव करण्यासाठी पावलं उचलत आहे, असंही या संस्थेने म्हटलं आहे. मॉस्कोमधलं ब्रिटीश दुतावासाचं कार्यालय रशियाची हानी व्हावी या हेतूने जाणीवपूर्वक कारवाया करत असून आता त्या नियंत्रणाबाहेर गेल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी केला आहे.
Site Admin | September 13, 2024 3:24 PM | Russia