रशियाच्या कामचटका द्विपकल्पातून बेपत्ता झालेलं एन २ विमान आज पहाटे माऊंट टुंड्रॉवाया इथं सापडलं. विमानातल्या तीनही व्यक्तींना कामचटका बचाव पथकानं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं. आरोग्य तपासणीसाठी त्यांना मिकोवस्याया इथल्या इस्पितळात दाखल केल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Site Admin | December 22, 2024 7:49 PM | AN2 | Russia
रशियाच्या कामचटका द्विपकल्पातून बेपत्ता झालेलं एन २ विमान सापडलं
