रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी पाठवण्याची भारताची मागणी रशियानं मान्य केली आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा पुतिन यांनी मोदी यांची विनंती तात्काळ मान्य केली. सध्या रशियन सैन्यात ३५ ते ५० भारतीय मदतीस म्हणून काम करतात. तर दहा जण आधीच मायदेशी परतले आहेत.
Site Admin | July 10, 2024 1:15 PM | Foreign Secretary Vinay Kwatra | India | Russia