चेर्नोबिल अणुप्रकल्पाचं संरक्षक कवच भेदल्याचा आरोप रशियाने फेटाळला आहे. रशियाचे युक्रेनमधले प्रतिनिधी दिमित्री पेस्कॉव्ह यांनी आज क्यीव्हमधे पत्रकारपरिषदेत सांगितलं की अणुप्रकल्पांवर किंवा संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा विषयच कधी उद्भवला नसून रशियाच्या सैन्याने असं काहीही केलेलं नाही. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी युक्रेनियन अधिकाऱ्यांनी ही आवई उठवल्याचा प्रत्यारोप पेस्कॉव्ह यांनी केला.
Site Admin | February 14, 2025 8:13 PM | Russia
चेर्नोबिल अणुप्रकल्पाचं संरक्षक कवच भेदल्याचा आरोप रशियानं फेटाळला
