पतीचं निधन झालेल्या महिलांना विधवा न म्हणता पूर्णांगिनी म्हणावं, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज केलं. त्या छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेला संबोधित करत होत्या. या कार्यशाळेचं उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते झालं. संबोधनातला हा बदल करण्यासंदर्भात राज्य महिला आयोगानं शासनाकडे शिफारस केल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | February 13, 2025 3:59 PM | Rupali Chakankar
विधवा महिलांना पूर्णांगिनी म्हणावं – रुपाली चाकणकर
