कोकणाला एक वैचारिक बैठक असून इथे महिलांचा सन्मान राखला जातो असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं. आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत चाकणकर यांनी आज सिंधुदुर्गात ओरोस इथं जनसुनावणी घेतली, त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जनसुनावणीत आलेल्या एकशे वीस तक्रारींपैकी एकही तक्रार लैंगिक अत्याचाराची नव्हती असं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतल्या सरकारी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या आहेत. मात्र खाजगी आस्थापनांपैकी ज्यामध्ये अशा समित्या अद्याप नाहीत त्यांना दंड करावा आणि समित्या स्थापन कराव्या असे निर्देश त्यांनी कामगार आयुक्तांना दिले.
Site Admin | December 19, 2024 6:59 PM | Rupali Chakankar
आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्गात जनसुनावणी
