विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यातील राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी स्वीप उपक्रमा अंतर्गत पालघर मध्ये आज रन फॉर वोट चं आयोजन करण्यात आलं होत.
या ३ कि.मी आणि ५ कि.मी मॅरेथॉन मध्ये पालघर शहर, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र तसचं पालघर जिल्ह्यातल्या शाळा-कॉलेज मधील १८ वर्षाखालील मुलं आणि मुली, १८ वर्षावरील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, कीडा संस्था, विविध कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस, भारत स्काऊड गाईड, N.S.S., N.C.C चे विद्यार्थी, शिक्षक आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही रन हुतात्मा स्तंभां पासून सुरु होवून वळणनाका, आंबेडकर चौक, रिलायन्स मॉल होत पाचबत्ती इथं समाप्त झाली.
यावेळी या मॅरेथॉन मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि मेडल देऊन गौरविण्यात आलं. तसचं या रन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना मेडल देवून सन्मानित करण्यात आलं.