तेलक्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक २०२४ ला आज राज्यसभेत मंजुरी देण्यात आली. या विधेयका अंतर्गत तेलक्षेत्र नियमन आणि सुधरणा विधेयक १९४८ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. सुधारित कायद्यामध्ये खनिज तेलाची व्याप्ती वाढणार आहे.
धोरणात स्थैर्य, विवादांचं सुलभ निराकरण या विधेयकामुळे सोपं होईल, तसंच तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ होईल, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं. मागच्या तीन वर्षात तेलांच्या किमती कमी झाल्याचंही सिंग यांनी सांगितलं.