पेट्रोल-इथेनॉल मिश्रणामुळे नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत २८ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत झाली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. डिझेलमधे इथेनॉलचं मिश्रण करण्यासाठी सरकारनं कोणताही कार्यक्रम हाती घेतलेला नाही, असं त्यांनी सांगितलं. मात्र डिझेलमधे ५ टक्के इथेनॉल मिसळून कार्बन उत्सर्जन आणि कामगिरी पडताळण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं २०२२-२३ मधे आक पथदर्शी मूल्यांकन केलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली.