राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरुद्ध दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळला आहे. अध्यक्ष धनखड पक्षपात करत असल्याचा आरोप करुन विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडला होता. तो घाईघाईने, कसातरी आणि केवळ अध्यक्षांचं प्रतिमाहनन करण्यासाठी मांडला गेल्याची प्रतिक्रीया हरिवंश यांनी फेटाळताना दिली. या प्रस्तावामुळे संवैधानिक संस्थांचंही हनन होत असल्याचं ते म्हणाले. १० डिसेंबर रोजी किमान ६० सदस्यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव मांडण्याची नोटीस देण्यात आली होती.
Site Admin | December 19, 2024 8:27 PM | Winter Session of Parliament