डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यावर उद्या एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज दिवसभरासाठी स्थगित झालं. लोकसभेत उद्या अर्थसंकल्प सादर झाल्यावर  एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होईल. 

राज्यसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सदस्यांनी खबरदारी घ्यावी आणि जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहन केलं.

केंद्र सरकारच्या हर घर जल योजना या उपक्रमाअंतर्गंत गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागातील ११ कोटी ७५ लाख घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केल्याची माहिती जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री वी. सोमन्ना यांनी एका लेखी उत्तरातून दिली. 

दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं छत कोसळल्याच्या घटनेची  चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लेखी उत्तरातून दिली. जबलपूर आणि राजकोटच्या विमानतळावर झालेल्या अशाच प्रकारच्या दुर्घटनेची चौकशी करणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. 

कावड यात्रा मार्गावरच्या दुकानांवरील पाट्या,युपीएससीची बनावट प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवरून काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळून लावला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा