रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी इथं केली. रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी ते बोलत होते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी आज रत्नागिरीत विविध आढावा बैठका घेतल्या.
Site Admin | July 25, 2024 7:43 PM | Ratnagiri | Uday Samant
‘रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी’
