बांगलादेशविरुद्धच्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. चेन्नईतल्या एमए चिदंबरम मैदानावर १९ तारखेपासून ही मालिका सुरू होणार आहे. के. एल राहुल आणि ऋषभ पंत यांचं संघात पुनरागमन झालं आहे, तर यश दयाल पहिल्यांदाच खेळणार आहे. ऋषभ पंत डिसेंबर २०२२ नंतर पहिल्यांदाच भारताच्या संघात खेळणार आहे. रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करणार आहे.
Site Admin | September 9, 2024 1:45 PM | Indian team | Rishabh Pant