६५ वर्षांवरच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या असंघटित क्षेत्रातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजिक योजनांचा लाभ पुरवण्यासाठी या महामंडळाची स्थापना झाल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना या महामंडळात नोंदणी करावी लागणार आहे. याखेरीज महामंडळाच्या सभासद चालकांना आयुर्विमा, अपघात विमा अशा योजना राबवण्याचे प्रस्ताव विचाराधीन आहेत.
Site Admin | February 13, 2025 7:54 PM | Minister Pratap Sarnaik
ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना-परिवहनमंत्र्यांची घोषणा
