कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, एम. नागराजू यांनी सध्या उत्पादन करणाऱ्या, उत्पादन वाढवू शकतात अशा आणि कार्यान्वीत नसलेल्या कोळसा खाणींचा नवी दिल्लीतल्या बैठकीत आढावा घेतला. कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत, ५४ बंदिस्त आणि व्यावसायिक कोळसा खाणींचे उत्पादन सुरू आहे, त्यापैकी ३२ खाणी ऊर्जा क्षेत्राला, आणि १० खाणी कोळशाच्या विक्रीसाठी वाटप केल्या माहिती कोळसा मत्रालयानं दिली. २०२५ पर्यंत आणखी अकरा खाणींमधून कोळसा उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा असल्याचं मत्रालयानं सांगितलं.
Site Admin | July 2, 2024 8:03 PM
कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी नवी दिल्लीत आढावा बैठक
