राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा आज केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. उंच इमारती तसंच २०० पेक्षा जास्त घरं असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्याची निवडणूक आयोगाची सूचना आहे. याचा आढावा या बैठकीत झाला. मतदार यादीचं अद्ययावतीकरण, नवीन मतदान केंद्रे उभारणं यासह विविध सूचना आयोगानं यावेळी केल्या. राज्याचे निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई, ठाणे, पालघरचे महानगर पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, डॉ.सुखबीर सिंग संधू यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मार्गदर्शन केले.
Site Admin | July 8, 2024 7:06 PM