डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मेंदूशी संबंधित चांदीपुरा विषाणूप्रकरणी आरोग्य सेवा महासंचालकांकडून आढावा

आरोग्य सेवा महासंचालनालयांचे संचालक अतुल गोयल यांनी तज्ञांसह चांदीपुरा विषाणू प्रकरणी आणि गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम म्हणजेच मेंदूशी संबंधित आजाराचा काल आढावा घेतला. त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परीस्थितीवर तपशीलवार चर्चा आणि पुनरावलोकन केल्यानंतर संक्रामक घटकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे.

तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम हा वैद्यकीयदृष्ट्या समान चेतासंस्थात्मक घटकांचा समूह असून ते विविध विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी आणि इतर रसायनांमुळे तयार होतात. चांदीपुरा इथं आढळलेला विषाणू हा देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिणेकडील भागात, विशेषत: पावसाळी हंगामात त्याचा उद्रेक होतो. माशा आणि गोचीड यांद्वारे हे विषाणू पसरतात. प्रतिबंध , स्वच्छता आणि जागरूकता हेच या रोगाविरूद्धचे उपाय आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा