नैर्ऋत्य मोसमी पावसाचा भारतीय उपखंडावरुन परतीचा प्रवास काल पूर्ण झाला, त्याचवेळी ईशान्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून सुमारे ४९० किलोमीटर अंतरावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आज पुद्दुचेरी आणि नेल्लोर दरम्यान उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आणि येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
चेन्नई, कुड्डालोर, एन्नोर, कट्टुपल्ली आणि पुद्दुचेरी इथं वादळाचा इशारा देण्यात आला असून थुथुकुडी, पंबन आणि कराईकलमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. आज मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं जिल्ह्यातली शाळा महाविद्यालयं बंद आहेत.