बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगला देशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ढाक्यातलं प्रधानमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान गोनोभवनवर आज शेकडो आंदोलकांनी हल्ला केला. त्यानंतर शेख हसीना देश सोडून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी निघून गेल्याचं वृत्त आहे. देश चालवण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल, असं बांगलादेशाचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी म्हटलं आहे. दूरचित्रवाणी वरून संबोधित करताना त्यांनी देशवासियांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान काल पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत सुमारे १०० लोक ठार झाले आणि १ हजारहून अधिक जण जखमी झाले.
Site Admin | August 5, 2024 7:13 PM | Bangladesh | Sheikh Hasina