भारतीय रिझर्व्ह बँक आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पतधोरण समितीची पहिली बैठक आहे. या पतधोरणात रेपोदरात किमान पाव टक्क्यानं कपात केली जाईल अशी अपेक्षा आहे. जवळपास पाच वर्षांच्या अंतरानंतर व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे. कोविडची जागतिक साथ आणि त्यानंतरच्या टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2020 मध्ये रेपो दर 40 आधारभूत अंकांनी कमी करून 4 टक्क्यांवर आणला होता.
Site Admin | February 7, 2025 9:14 AM | Reserve Bank of India | गव्हर्नर संजय मल्होत्रा | द्वैमासिक पतधोरण
भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार; रेपोदरात कपातीची अपेक्षा
