डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बँक कर्जासंबंधीच्या क्षेत्रातली मासिक आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँके कडून जाहीर

बँक कर्जासंबंधीच्या क्षेत्रातली मासिक आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने काल जाहीर केली. या आकडेवारीत कृषी आणि संबंधित क्षेत्रातल्या कर्जांमध्ये मागच्या काहीवर्षांच्या तुलनेने यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १७ पूर्णांक ७ दशांश टक्क्याची वाढ दिसून आली आहे. याच कालावधीत उद्योगांना दिलेल्या कर्जातही १० टक्क्याची वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने रसायनं आणि रासायनिक उत्पादनं, अन्न प्रक्रिया, पेट्रोलियम आणि पायाभूत सुविधांसाठीच्या कर्जांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. सेवा क्षेत्राच्या आकडेवारीत मात्र गेल्या वर्षीच्या २१ टक्क्यांच्या तुलनेने यंदा ऑगस्ट महिन्यात १५ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकी घट दिसून आली. याच कालावधीत वैयक्तिक कर्जातली वाढ १६ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांवर आली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा