भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त धोरण समितीची बैठक काल मुंबईत झाली. उद्या बँकेचं वित्त धोरण जाहीर होणार आहे. बँकेनं फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून, तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर स्थिर राखला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाइटची मर्यादा ५०० रुपयांवरुन एक हजार रुपये केली आहे. मात्र, एकंदर मर्यादा पाच हजार असल्याचं बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या नवीन मर्यादा तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.
Site Admin | December 5, 2024 2:35 PM | भारतीय रिझर्व्ह बँक | वित्त धोरण