भारताच्या समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी मजबूत आर्थिक क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. मिशेल पात्रा यांनी म्हटलं आहे. ते आज भारतीय उद्योग महासंघानं मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेला संबोधित करत होते. अर्थकारण आणि विकासामधला परस्पर संबंध लक्षात घेता, भारताचं भविष्य घडवण्यात आणि त्याला आकार देण्यात आर्थिक क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व असल्याचं ते यावेळी म्हणाले.
डॉ. पात्रा यांनी पायाभूत सुविधांचा अर्थपुरवठा, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कौशल्य विकास, हवामान बदल आणि डिजिटायझेशन यासह पाच विशिष्ट क्षेत्रांची रूपरेषा स्पष्ट केली, आणि ते म्हणाले की, या क्षेत्रांमध्ये एक प्रमुख शक्ती म्हणून भारताच्या उद्यासाठी अर्थ क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल.