डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

RBIचं चालू आर्थिक वर्षाचं पहिलं पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाचं पहिलं पतधोरण आज जाहीर झालं. बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं रेपो दरात पाव टक्के कपात करून तो ६ टक्क्यांवर आणला आहे. पतधोरण समितीनं चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दराचा अंदाज सहा पूर्णांक ७ दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत खाली आणल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे. गेल्या बैठकीत हा दर ६ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असा अंदाज पतधोरण आढावा समितीनं वर्तवला होता. त्याचवेळी गेल्या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक वृद्धी दराचा ६ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांवरुन वाढवून साडे ६ टक्के होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

 

या आर्थिक वर्षात देशाचा किरकोळ महागाई दर ४ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचंही मल्होत्रा यांनी सांगितलं. यापूर्वी हा दर ४ पूर्णांक ८ टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला होता.

 

याव्यतिरिक्त, सोने तारण कर्जाच्या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सर्वसमावेशक नियमावली प्रसिद्ध करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच यूपीआय द्वारे होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार असल्याचं सूतोवाचही त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा