भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला असून निव्वळ बुडीत कर्जाचं प्रमाण २ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकं कमी झालं आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये नोंदवलं गेलेलं हे प्रमाण म्हणजे गेल्या बारा वर्षातला नीचांक आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वित्तीय स्थिरता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मागील दोन वर्षांमध्ये निव्वळ बुडीत कर्जामधल्या मोठ्या कर्जदारांच्या संख्येत घट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
Site Admin | December 31, 2024 1:07 PM | Reserve Bank of India