शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक आहे. किंमत स्थिरतेमुळे बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते आणि अर्थव्यवस्था आणि जनता दोघांनाही लाभ होतो, असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ग्लोबल साऊथच्या उच्च स्तरीय बैठकीत केलं. विकास आणि चलनवाढ यांच्यातील समतोल साधण्यासाठी वित्तीय आणि आर्थिक समन्वय महत्त्वाचा आहे असंही शक्तिकांत दास यांनी सांगितलं.
Site Admin | November 21, 2024 8:05 PM | Reserve Bank Governor Shaktikanta Das
शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक – शक्तिकांत दास
