डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वंचित बहुजन आघाडीची २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा

ओबीसी आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होणार असून विदर्भ, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून या यात्रेचा प्रवास होईल. ८ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं यात्रेची सांगता होणार आहे. 

 

एसटी, एससी शिष्यवृत्ती वाढ व्हावी, ओबीसी विद्यार्थ्यांना एसटी एससी शिष्यवृत्ती लागू करावी, तसंच जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळावं, या मागण्यांचा या यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. यासाठी यात्रेदरम्यान ठिकठिकाणी कॉर्नर बैठका तसंच मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा