आसाममध्ये दिमा हासाओ जिल्ह्यातल्या उमरंगसो इथे पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह भारतीय नोदलाच्या २१ पॅरा डायव्हर्सने बाहेर काढला. ही व्यक्ती नेपाळची नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या खाणीत अडकलेल्या अन्य कामगारांना बाहेर काढण्याचं काम अद्याप सुरू आहे.
ही कोळसा खाण मेघालयच्या सीमेजवळ असून त्यात बेकायदेशीर रित्या खाणकाम सुरू होतं. आसाम सरकारने नौदलाच्या पाणबुड्यांना बचावकार्यासाठी पाचारण केलं असून उर्वरित खाण कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.