कोळशाच्या भट्टीवर डांबून ठेवलेल्या २६ वेठबिगार कामगारांची सुटका पुणे पोलिसांनी केली. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातल्या गिरवी गावात या कामगारांना सहकुटुंब डांबून ठेवून त्यांच्याकडून सक्तीने काम करुन घेतलं जात होतं. याची खबर मिळाल्यावर श्रमजीवी संघटनेनं पोलिसांकडे धाव घेतली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी २६ पुरुष कामगार आणि त्यांची कुटुंबं मिळून एकूण ४८ जणांची सुटका केली, तसंच त्यांना डांबून ठेवणारा सयाजी बांदलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Site Admin | February 7, 2025 3:25 PM | कोळसा भट्टी | पुणे
कोळशाच्या भट्टीवर डांबून ठेवलेल्या २६ वेठबिगार कामगारांची सुटका
