या वर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली इथं कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा साक्षीदार होण्यासाठी देशभरातून १० हजार विशेष पाहुणे आमंत्रित करण्यात आले आहेत. या विशेष निमंत्रितांमध्ये मुंबईतल्या पाच जणांचा समावेश आहे. त्यात अँटॉप हिल इथले अतुल जाधव आणि वसई इथले वैभव नितीन पाटील यांना प्रधानमंत्री यशस्वी योजनेच्या श्रेणीत आमंत्रित केलं आहे. कलाकार निवास विभागात शिल्पगुरू आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त ब्रह्मदेव पंडित, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभय ब्रह्मदेव पंडित यांची निवड करण्यात आली आहे. हस्तकला श्रेणीत महाराष्ट्र टेक्सटाईल कार्पोरेशनच्या सहाय्यक आयुक्त उज्वला सदाशिवराव पाटील यांना आमंत्रित केलं आहे. महाराष्ट्रातून एकूण २३ विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
Site Admin | January 11, 2025 8:56 PM | 26 january
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातल्या २३ जणांना विशेष आमंत्रण
