देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन राज्यात इतरत्रही मोठ्या उत्साहात साजरा झाला.
नवी मुंबईत कळंबोली इथे पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण स्तरावरचं ध्वजारोहण संपन्न झालं. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी तिरंगा फडकावला. या कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई पोलीस पथकासह विविध पथकांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात अलिबाग इथे पोलीस मैदानावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रत्नागिरी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या यावेळी हस्ते ध्वजारोहण झालं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिसांच्या तुकड्यांनी पथसंचलन केल्यानंतर राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पालघर इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोळगाव पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कोल्हापूर इथं पालकमंत्री, प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तर सातारा इथं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सोलापूर येथील परेड मैदानावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. अहिल्या नगर इथल्या पोलिस मुख्यालय प्रांगणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.धाराशिव इथं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. परभणीत राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते, बीड इथं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. जालना इथं पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आणि नांदेडमध्ये राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण झालं.
जळगाव इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम झाला. धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं.
बुलडाणा इथं पालकमंत्री मकरंद पाटील, अकोला इथं पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते तर वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यवतमाळ इथं पालकमंत्री संजय राठोड तर गडचिरोलीत सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. गोंदिया इथं पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भंडारा इथं पालकमंत्री संजय सावकारे यांनी पोलीस ग्राउंडवर आयोजित कार्यक्रमात तिरंगा फडकावला. चंद्रपूर मध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.