अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सहसंचालक डॉ. प्रवीण कथने यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यात पुणे जिल्ह्यातल्या काऱ्हाटी गावच्या दिपाली लोणकर, अमरावती जिल्ह्यातल्या, जरुडी इथले सुधार मानकर, सातारा जिल्ह्यातल्या किरकसालचे अमोल काटकर, धाराशिव जिल्ह्यातल्या खेडचे सुनील गरड, सांगली जिल्ह्यातल्या नानगोलेच्या छाया कोळेकर, आणि लातूर जिल्ह्यातल्या हरांगूलच्या शीतल झुंजारे, यांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात नवी दिल्लीत मूळच्या बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या देवडी इथल्या फ्लाईंग ऑफीसर दामिनी देशमुख या परेड कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.