७६वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहानं देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली. देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे १६ विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे मिळून ३१ चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वर्णिम भारत विरासत और विकास ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती.
या सोहळ्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.