शाश्वत भविष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, २०३० सालापर्यंत ५० टक्के बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उदघाटन सत्रात बोलत होते. भारतामध्ये नवीकरणीय ऊर्जा स्रोत विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने हरित ऊर्जा क्षेत्र आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य बनवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. जगभरात हरित ऊर्जेपासून बनवलेल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता, आपल्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा पुरेपूर लाभ घेण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 9, 2025 6:53 PM | renewable energy
२०३०पर्यंत ५०% बिगरजीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध – मंत्री प्रल्हाद जोशी
