कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयलामधील निवासी डॉक्टरवर कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयनं आणि कोलकाता पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर केला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी आंदोलक डॉक्टरांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनाचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या विविध संघटनांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान आरजी कार वैद्यकीय महविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.