शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही असं सपकाळ म्हणाले. कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वक्तव्य केलं होतं.