डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य २०२३’ हा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचं सांगत भारतानं फेटाळला

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य २०२३’ हा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचं सांगत भारतानं तो फेटाळला आहे. भारतातील सामाजिक रचनेविषयीचं अज्ञान या अहवालातून दिसून येत असून तो मतपेढीनं प्रेरित आणि पूर्वग्रहदूषित असल्याचं दिसत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. एकतर्फी आणि पक्षपाती स्रोत, निवडक विशिष्ट घटना यावर अहवाल बेतलेला असल्याचं ते म्हणाले. या अहवालात देशातील काही कायद्यांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. मात्र अमेरिकेत यापेक्षा अधिक कठोर कायदे आणि निर्बंध असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. मानवाधिकार आणि विविधतेचा सन्मान हे भारत आणि अमेरिकेतले चर्चेचे विषय राहिले असून पुढेही ते राहतील, मात्र अशा प्रकारचा संवाद दुसऱ्या देशात परकीय हस्तक्षेपाचा परवाना बनता कामा नये, असं जयस्वाल म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा