राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचं अनुदान देण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. हे दर येत्या १ जुलै पासून लागू आहेत. याच बैठकीत दूध पावडरसाठी प्रतिकिलो ३० रुपये अनुदान देण्यावरही शिक्कमोर्तब झालं. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला जाईल असंही मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं.
Site Admin | July 5, 2024 8:03 PM | farmers | Maharashtra
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
