गेल्या वर्षा अखेरीपर्यंत ४ हजार ३०० पेक्षा जास्त FPO, म्हणजेच कृषी उत्पादक संस्थांनी ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली असून, या संस्थांमधल्या ४ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना २४९ कोटी रुपये देण्यात आल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते.
देशातली एकूण २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आंतरराज्य व्यवसायासाठी ई-नाम पोर्टलशी जोडली गेली असून, आंतरराज्य व्यापारा अंतर्गत शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार कोटी रुपयांची थेट मदत देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.