डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी एक लाख ५९ हजारच्या वर

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिकाधिक चालना मिळत असून सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी एक लाख ५९ हजारच्या वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २३ टक्क्यांनी नोंदणी वाढल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीत म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे. तर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी ८ लाख ९३ हजार इतकी झाली आहे.

 

याच अनुषंगानं काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह योजनेचा प्रारंभ करण्यात आला. देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणं आणि चार्जिंगसाठी सर्वत्र आवश्यक पायाभूत सुविधा स्थापना करून स्वच्छ तसंच शाश्‍वत वाहतुकीला प्रोत्साहन देणं हे या योजनेचं उद्दिष्‍ट आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा