डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत सुमारे ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. गरोदर महिलांना तसंच नवजात ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना १२ प्रकारच्या रोगांसाठी या कार्यक्रमांतर्गत जीवनरक्षक लस देण्यात येते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

संकेतस्थळावरल्या नोंदीनुसार १ कोटी २६ लाख लसीकरण सत्रं आयोजित करण्यात आली असून सुमारे २७ कोटी ७७ लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यूआयपीच्या वार्षिक उद्दिष्टामध्ये सुमारे २ कोटी ९ लाख गर्भवती महिला तसंच २ कोटी ६ लाख अर्भकांचा समावेश आहे, असं पटेल म्हणाल्या. यू विन बद्दल जनजागृती करण्यासाठी मंत्रालयातर्फे व्यापक समाज माध्यम मोहीम देखील राबवण्यात येत आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा